Get Together
काटदरे परिवाराचे पहिले संमेलन

पहिलच काटदरे परिवार संमेलन 2017, चिपळूण येथे 27 आणि 28 मे रोजी यशस्वी पणे संपन्न झाल. अतिशय शिस्तबद्ध उभारलेली संपर्क रचना, आवश्यक पूर्व प्रसिद्धि आणि संपूर्ण परिवाराने दिलेल्या उत्साहकारक प्रतिसादामुळे हे शक्य झाल. महाड, मसूर, बदलापुर, सातारा, ठाणे, मुंबई आणि आपल्या 7 गावातील मंडळी अतिशय प्रेमाने आणि जोशाने या संमेलनात सहभागी झाली. कै. श्री. माधव काटदरे, यांच्या स्मरणाने आपल्या कार्यक्रमाला सुरवात झाली, मा. सौ. रेखा देशपांडे मैडम यांनी या पहिल्या सत्रात मार्गदर्शन केल. नंतर आपल्या जमदग्नि स्वभाव विशेषा नुसार आपल्या परिचय सत्रात ओळख करुन घेण्यात आली. संमेलनाची दिशा आणि काही प्रश्न आवाजी मतदानाने संमत करण्यात आले. भाऊ काटदरे यांनी हे सत्र अतिशय परिणाम कारक रित्या पुढे नेल.
शिरा पुरीचा आस्वाद घेवून, रात्री दक्षता आणि हर्षल ने मनोरंजन सत्र घेतल आणि त्यात विविध वयोगटातील मंडळीनी कला सादर करुन रंगत आणली. सकाळी तिसऱ्या सत्रात भाऊनी नेत्रदान विषयावर थोडक्यात माहिती देत, सगळ्या काटदरे मंडळी द्वारे नेत्र दानाचा संकल्प करुन घेतला. आता या संमेलनापासुन नेत्रदान ही गोष्ट आपल्या कुळाचारात समाविष्ठ झालेली आहे (सर्व संमतीने) ही आनंदाची बाब आहे. केतन आणि अमृतराज यानी website संकल्पना लोकांसमोर मांडुन झाल्यावर सौ शुभांगीजी यांच्या वीर सावरकर स्मरणाने आणि नंतर गीता पठण करुन मुख्य सत्राला सुरवात झाली. जेष्ठ नागरिक सत्कार, कै.मनोहर काटदरे यांच स्मरण झाल्यावर, समस्त पारिवाराच्या वतीने भाऊंचा शाल श्रीफल आणि मानपत्र देवून सन्मान करण्यात आला. अमोद काटदरे आणि अवधूत काटदरे यानी नंतर घेतलेली भाऊंची मुलाखत तर अतिशय सुंदर झाली. संमेलनाचे ध्येय उदिष्ट revised करुन पुढील कामासाठी 15 जणांची कमिटी स्थापन कण्यात आली. बदलापुर आणि शीर येथील पुढील संमेलनाच्या प्रस्तावावर तसेच इतर विषयावर ही कमिटी निर्णय घेईल. यानंतर उपस्थित मंडळी ना मनोगत संधी देवून, अमेय ने आभार प्रदर्शन केले. दक्षता,वैशाली आणि प्रणिता यानी सादर केलेल्या पसायदानाने संमेलन सांगता झाली.
दीपक जी, गुरुनाथ जी यांच नियोजन, यामुळेच हे संमेलन या परशुराम भुमीत यशस्वीपणे संपन्न झाल. बी ए काटदरे सातारा, प्रभाकर काटदरे, मोरेश्वर काटदरे ठाणे, सौ पाटणकर, सदानंद काटदरे ठाणे, प्रमोद काटदरे कराड, शिवनंदन काटदरे पार्ले यांनी सदर संमेलन व इतर योजना या करीता देणगी देवून सहकार्य केल आणि विश्वास दाखवला या बद्दल आभार. आणि संपूर्ण काटदरे मंडळी जी,एका विनंतीवर उत्साहाने सहभागी झाली अशा सर्व मंडळी ना नमस्कार! साभार WhatsApp – अमेय काटदरे.